बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच ‘गन्स अँड गुलाब्स’ या आगामी वेब सीरिजमधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे, वेब सीरिजमध्ये ९० च्या दशकाची प्रेक्षकांना झलक पाहायला मिळणार आहे असं या फर्स्ट लूकवरुन स्पष्ट होत आहे. यामुळे प्रेक्षक चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

या वेब सीरिजमध्ये अनेक दमदार कलाकार एकत्र दिसणार आहेत. निर्मात्यांनी सीरिजच्या ट्रेलरची तारीख जाहीर करणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमार रावसह इतर स्टार्सची पहिली झलक पाहायला मिळत आहे. ‘गन्स अँड गुलाब्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवर २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : गौरीशी लग्न करण्यासाठी शाहरुखने बदललेलं स्वतःचं नाव; ‘हे’ होतं किंग खानचं खरं नाव

या आगामी वेब सीरिजमध्ये राजकुमार रावबरोबर दुल्कर सलमानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओमध्ये दुल्करचा जबरदस्त लूक दिसत आहे. या दोन स्टार्सशिवाय या वेब सीरिजमध्ये आदर्श गौरव, गुलशन देवय्या आणि टीजे भानू हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेची कथा ९० च्या दशकातील गुन्हेगारी विश्वावर बेतलेली असेल असा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द फॅमिलीमॅन’ आणि ‘फर्जी’सारखे शो आपल्याला देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी ह्या सीरिजची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया यांनी ‘गन्स अँड गुलाब्स’चे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक आता याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत आहेत. १८ ऑगस्टपासून ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.