Animal OTT Release: संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या एका वेगळ्या अवताराला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांची भूमिका चांगलीच हीट ठरली. चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना चांगलं वेड लावलं. बॉक्सवर ऑफिसवर ‘अ‍ॅनिमल’ने बक्कळ कमाई केली. आता ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी ‘अ‍ॅनिमल’ सज्ज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यावरून वाद सुरू होते. कायदेशीर कचाट्यात चित्रपट अडकला होता. पण आता ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
Samantha Ruth Prabhu in atlees upcoming film with south star allu arjun
ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

हेही वाचा – साई पल्लवीच्या बहिणीचा झाला साखरपुडा, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “माझी…”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे अधिकार ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सने आज ‘अ‍ॅनिमल’ चाहत्यांसाठी खुशखबर दिली आहे. प्रजासत्ताक दिना दिवशी म्हणजेच २६ जानेवारीपासून ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये रणबीरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – Pooja Sawant Birthday: ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचं प्राणीमय जग

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक सीन्सवर कात्री लावण्यात आली होती. त्यामुळे ओटीटीवर हे सीन्स पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांना आशा होती. पण दिल्ली हायकोर्टाने चित्रपटातील सेंसर बोर्डने हटवलेले सीन्स ओटीटीवर दाखवण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे चित्रपटगृहात ‘अ‍ॅनिमल’ पाहायला मिळाला तसाच ओटीटीवर स्ट्रिमिंग होणार आहे.