Shark Tank India Season 3: ‘शार्क टॅंक इंडिया’च्या दोन्ही पर्वांना तरुणवर्ग, उद्योजकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे दोन्ही सीझन चांगलेच लोकप्रिय झाले होते. आता ‘शार्क टॅंक इंडिया’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण या कार्यक्रमाचे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सोनी लिव्ह’ने या संदर्भात घोषणा केली असून याचा एक मजेशीर प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

याआधी एक प्रोमो सोनीने प्रदर्शित झाला होता, आता पुन्हा नवीन प्रोमोबरोबरच त्यांनी या नवीन सीझनच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. इतकंच नव्हे तर या नव्या सीझनमध्ये चार किंवा पाच नव्हे तर तब्बल १२ शार्क सहभागी होणार आहे. नव्या प्रोमोमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारा एक सहकारी नोकरी सोडून स्टार्ट-अप सुरू करताना दाखवला आहे.

आणखी वाचा : रणबीर थोडा विचलित तर रणवीरचं आधीचं काम नापसंत; ‘केजीएफ’ स्टार यशने केलेलं बॉलिवूड अभिनेत्यांविषयी वक्तव्य

अत्यंत मजेशीर अशा या प्रोमोमध्ये बेमालुमपणे स्वतःची कंपनी सुरू करणे आणि दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी करणे यातील फरक स्पष्टपणे मांडून दाखवला आहे. प्रोमोच्या शेवटी हाच नोकरी करणारा तरुण शार्क टँकच्या आपल्या व्यवसायासाठी भांडवल जमवताना पाहायला मिळत आहे. आधीच्या सीझनचे अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नामिता थापर, विनीता सिंग आणि पीयूष बन्सल हे फाऊंडर शार्क म्हणून पुन्हा दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shark Tank India (@sharktank.india)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यांच्याबरोबरच ‘ओयो रूम्स’चे संचालक रितेश अग्रवाल, ‘झोमॅटो’चे संचालक व संस्थापक दीपींदर गोयल, ‘इनशॉर्ट्स’ सह-संस्थापक अझर इकबाल, ‘एको’चे संस्थापक वरुण दुवा आणि ‘अपग्रॅड’ कंपनीचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला हे नवीन शार्क या तिसऱ्या सीझनमध्ये एंट्री घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. आधीच्या सीझनप्रमाणेच अशनीर ग्रोव्हरने यंदाच्या सीझनमध्येही सहभागी होण्यास नकार दिला आहे. ‘शार्क टँक इंडिया’चा तिसरा सीझन २२ जानेवारीपासून सोनी टेलिव्हिजन या चॅनल आणि सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.