अभिनेत्री सई ताम्हणकर सध्याची मराठी चित्रसृष्टीमधील आघाडीची नायिका आहे. तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनई चौघडे’ हा तिचा पहिला चित्रपट आहे असे बऱ्याच लोकांना वाटते. पण त्याआधी तिने एका हिंदी चित्रपटामध्ये काम करुन मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. ती मणी रत्नम यांच्या ‘नवरसम’ या तमिळ वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असलेली सई ताम्हणकर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी व्हायरल होतात. तिने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने “जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटपासून खूप दूर असलेल्या ठिकाणी शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत काम केलं. हीच जुळवून घेण्याची वृत्ती टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्या कामी आली” असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने ‘मला शोधून दाखवा’ असेही लिहिले आहे.

आणखी वाचा – “रोमँटिक झाल्यानंतर जया…” खासगी आयुष्याबद्दल नॅशनल टेलिव्हिजनवर अमिताभ बच्चन यांचा खुलासा

सईने शेअर केलेला हा फोटो तिच्या ‘इंडिया लॉ़कडाऊन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर ती झोपली आहे. एका हाताने तिने काळ्या रंगाची छत्री पकडली आहे. त्यांच्या टीममधला एक माणूस ती छत्री पकडून उभा आहे. त्या हातगाडीच्या मागे बाकीचे लोक दुसऱ्या सीनची तयारी करत आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. कालच या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला होता.

आणखी वाचा – प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटामध्ये ती एका मजूराच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. अभिनेता प्रतीक बब्बर तिच्या पतीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सई, प्रतीक यांच्यासह या चित्रपटामध्ये श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाचे नाव आणि ट्रेलर या दोन गोष्टींवरुन या चित्रपटाची पार्श्वभूमी करोना काळातली आहे हे लगेच लक्षात येते. मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.