१६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस दमदार कमाई करणाऱ्या या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळाली होती. सोमवारपासूनच प्रेक्षकांची बॉक्स ऑफिसवर गर्दी पाहायला मिळत नाहीये.

मोठ्या पडद्यावर ‘आदिपुरुष’ने निराशा केली असली तरी छोट्या पडद्यावर वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लाडका भाईजान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी ओटीटीवर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. २३ जूनपासून हा चित्रपट उपलब्ध झाला आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानचं ‘ते’ सुपरहीट गाणं सुखविंदर सिंग यांनी अनवाणी पायांनी रेकॉर्ड केलेलं; गायकाने सांगितला किस्सा

याबरोबरच मनीष पॉलची ‘रफूचक्कर’ ही वेब सीरिजची ‘जिओ सिनेमा’ या ओटीटीवर पाहता येईल. यामध्ये सुशांत सिंह, प्रिया बापट यांच्याही भूमिका आहेत. शिवाय नवाजुद्दीन सिद्दिकी व अवनीत कौरचा ‘टिकू वेड्स शेरु’ हा चित्रपटही प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगनाने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २९ जूनला नेटफ्लिक्सवर ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. काजोल, विजय वर्मा, तमन्ना भाटीया, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष, तिलोत्तमा शोम, आम्रता सुभाष, अंगद बेदी, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता असे दिग्गज कलाकार यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एकूणच या वीकेंडला ‘आदिपुरुष’ पाहायची इच्छा नसेल तर ओटीटीवरील या पर्यायांचा एकदा विचार करूच शकता.