बॉलिवूडच्या प्रत्येक नटाला ओटीटीची भुरळ पडलेली आहे. हिंदी चित्रपटात काम करणारा प्रत्येक अभिनेता या माध्यमाकडे वळत आहे. सैफ अली खानपासून, अभिषेक बच्चन ते पंकज त्रिपाठीपर्यंत कित्येक नटांनी य माध्यमाचा पुरेपूर वापर केला आहे. आता शाहिद कपूरनेही यात उडी घेतली आहे. शाहिद आता त्याच्या ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे.

‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्याबरोबर शाहिद ओटीटीविश्वात पदार्पण करणार आहे. ‘फर्जी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून शाहिद लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याने त्याच्या या सिरिजमधील त्याच्या भूमिकेचा एक फर्स्ट लूक शेअर केला आहे. या व्हिडिओमधून शाहिद त्याच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाबद्दल आपल्याला सांगत आहे.

sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली

आणखी वाचा : “…तरीही नावापुढे खान का लावतो?” या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख खानने जिंकली चाहत्यांची मनं

“हे माझ्या आयुष्यातील एक नवं पर्व आहे, लोकांना हे आवडेल का? अखेर कलाकार हा नेहमीच कलाकार असतो नाही का?” असं म्हणत शाहिद व्हिडिओमध्ये एक पेंटिंग करताना दिसत आहे. ही वेबसीरिज एक क्राइम ड्रामा आहे जी एका कलाकाराच्या आयुष्याभोवती रचलेली आहे. प्राइम व्हिडिओवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये शाहिदसह विजय सेतुपती पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. यांच्याबरोबरच या वेबसीरिजमध्ये झाकीर खान, केके मेनन, अमोल पालेकर, राशी खन्ना कुब्रा सैत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या वेबसीरिजविषयी शाहिद पीटीआयशी संवाद साधताना म्हणाला, “ओटीटीवर पदार्पण करणं हे माझ्यासाठी एखादा ट्रेंड मोडण्यासारखं आहे. मला स्वतःला आव्हान द्यायला आवडतं. गेली २० वर्षं मी हेच करत आलो आहे. एखाद्या वेबसीरिजच्या ८ भागात एखादं पात्र कशापद्धतीने खुलवलं जातं हे जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. चित्रपटातील २ तासांच्या भूमिकेपेक्षा हे प्रचंड वेगळं आणि आव्हानात्मक आहे, मला यात काम करायला प्रचंड मजा आली.” अजूनतरी या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पक्की झाली नसली तरी लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.