Pathaan On OTT : शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण करण्यात शाहरुखला चांगलंच यश मिळालं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर प्रदर्शित करण्यात आला. साऱ्या जगभरात शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटाचे अडवांस बुकिंग परदेशात सुरू झाले आहे.

या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल नवीन माहिती समोर आली. ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शनापूर्वी सीबीएफसी बोर्डाने त्यात काही बदल सांगितले आहेत. या बदलांबद्दल सुनावणी होत असताना ‘पठाण’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. दृष्टिहीन प्रेक्षकांनाही चित्रपटाचा आनंद घेता यावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने ‘पठाण’च्या ओटीटी प्रदर्शनासाठी हिंदी भाषेत ऑडिओ वर्णन, क्लोज कॅप्शन आणि उप-शीर्षके तयार करण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा : भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून चाहते म्हणाले “ही उर्फी…”

हे बदल केल्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा सीबीएफसी बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. शाहरुखचा पठाण प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून २५ एप्रिलपासून तो ओटीटीवर पाहता येणार आहे, पण याआधी सुचवलेले बदल करून सीबीएफसी बोर्डाकडून प्रमाणपत्र घेऊनच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करता येणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यानंतर तो एप्रिल महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटात सुचवलेले बदल करून १० मार्चपर्यंत पुन्हा सर्टिफिकेशनसाठी पाठवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. अन्यथा ‘पठाण’च्या ओटीटी प्रदर्शनात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.