वीकेंडचा काही प्लॅन नाही? ओटीटीवर मनोरंजक चित्रपट पाहायचा आहे? मग या क्राइम-थ्रिलर चित्रपटासाठी तुम्ही अडीच तास काढायला हवे. खरं तर अलीकडे क्राइम-थ्रिलर चित्रपट पाहण्याकडे लोकांचा कल वाढतोय. कारण या चित्रपटांमध्ये जबरदस्त सस्पेन्स असतो आणि लोकांना कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तुम्हालाही जर असे चित्रपट पाहायला आवडत असतील तर यावर्षी रिलीज झालेला हा चित्रपट ओटीटीवर नक्की पाहा.

या चित्रपटाचे नाव ‘आयडेंटिटी’ (Identity on Zee5) आहे. हा चित्रपट २ जानेवारी २०२५ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. २ तास ३७ मिनिटांचा ‘आयडेंटिटी’ चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी व कन्नड भाषेत ओटीटीवर उपलब्ध आहे.

चित्रपटाची कथा

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे. ‘आयडेंटिटी’ चित्रपटाची कथा एक पोलीस अधिकारी व एका स्केच आर्टिस्टच्या सभोवताली फिरते. हे दोघे मिळून एक मर्डर मिस्ट्री सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

‘आयडेंटिटी’ चित्रपटाची जसजशी पुढे सरकते, तसतसे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होत जाते. नवनवीन ट्विस्टमुळे दोघे चक्रावतात आणि त्यांना लक्षात येतं की हा सामान्य खून नाही, तर एक असा कट आहे जो सोडवणं खूप अवघड आहे. या सिनेमात कारचा पाठलाग करणे, विमानात मारहाण होणे असे अनेक दमदार अॅक्शन सीन आहेत. यामुळे चित्रपट मनोरंजक होतो.

पाहा ट्रेलर-

चित्रपटात सस्पेन्स इतका आहे की पुढच्या क्षणी काय होईल याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही. ‘आयडेंटिटी’ चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. यातील ट्विस्ट पाहून हे नक्की काय चाललंय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आयडेंटिटी’ चित्रपटाचे बजेट १२ कोटी रुपये होते आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १८ कोटींहून जास्त कमाई केली होती. हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मल्याळम चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. याचे दिग्दर्शन अनस खान व अखिल पॉल यांनी केले आहे. या दोघांनीच सिनेमाची कथा लिहिली आहे. चित्रपटात त्रिशा कृष्णन, टोविनो थॉमस व गोपिका रमेशसह इतर अनेक कलाकार आहेत.