अभिनेत्री सुश्मिता सेन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. सुश्मिता मराठी दिग्दर्शक रवी जाधव याच्या ‘ताली’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी सुश्मिताने चांगलीच तयारी आहे याबरोबरच सुश्मिता तिच्या ‘आर्या’वेबसीरिजच्या माध्यमातूनही आपल्या समोर येणार आहे. ओटीटी विश्वातील लोकप्रिय वेबसीरिज ‘आर्या’चा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आर्या’ ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आणि हिच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मध्यंतरी या सिरिजचा पुढचा सीझन येणार नाही अशी बातमीदेखील बाहेर आली होती, पण नुकतंच अभिनेता सिकंदर खेर याने एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावर सिकंदरने सिरिजचे दिग्दर्शक राम माधवनी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत नव्या सीझनच्या वर्कशॉपची माहिती दिली आहे.

आणखी वाचा : ‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती

याविषयी बोलताना सिकंदर म्हणाला, “या जबरदस्त टीमबरोबर पुन्हा काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आम्ही आमच्या वर्कशॉपल सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत जे मी वाचलंय त्यावरून मी एवढं सांगू शकतो की प्रेक्षकांना या तिसऱ्या सीझनमध्ये एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. या सिरिजमधील माझं पात्र हे माझ्या करियरमधलं सर्वात महत्त्वाचं पात्र आहे. त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

View this post on Instagram

A post shared by SK (@sikandarkher)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्याच्या पहिला सीझनला ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारा’साठी नामांकन मिळालं होतं. यामध्ये सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असून सिकंदर खेर यात वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. यांच्याबरोबरच नमित दास, मनीष चौधरी यांच्यादेखील यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अजूनतरी या तिसऱ्या सीझनची तारीख निश्चित झाली नसून पुढील वर्षी ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.