बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केलं होतं. या वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीझन प्रदर्शित झाले आहे. आता याच वेब सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सुश्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडने या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आर्या ३’चा टीझर शेअर केला होता. रोहमन शॉलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टीझर शेअर केला आहे त्याचबरोबरीने त्याने स्वतःचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ज्यात टीझर बघून त्याने आपल्या हावभावांमधून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याने कॅप्शनदेखील लिहला आहे. हे तर पाहिजेच होतं, मला माहीत आहे की तुम्हा सर्वांना ते पाहून असेच वाटले असेल असा कॅप्शन त्याने लिहला आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिका यांनी रचला नवा विक्रम; टेलर स्विफ्ट, BTS बँडला टाकले मागे

रोहमन शॉल मुलाचा नोएडाचा असून २०१४ पासून मुंबईत स्थायिक झाला आहे. रोहमन एक मॉडेल असून तो उत्तम गिटारवादकदेखील आहे. दोघांची प्रेमकहाणी इन्स्टाग्रामवरूनच सुरु झाली होती. इन्स्टाग्रामवर रोहमनने सुश्मिताला मेसेज केला होता आणि इथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरवात झाली होती. मात्र सुश्मिताने नंतर आम्ही वेगळे झालो आहोत हे पोस्ट शेअर करत सांगितले होते.

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आर्या ३’चा टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुश्मिता खूपच डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर्या २’मध्ये सुश्मिताने तिच्या विरोधकांना संपवून आपल्या मुलांना घेऊन देश सोडून फरार झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तिच्या मते आता सगळं काही ठीक झालं आहे. पण असं नाहीये, तिचा आणखी एक विरोधक आहे. ज्याची एंट्री ‘आर्या ३’ मध्ये दाखवली जाणार आहे.