Trending Film On OTT: सध्या ओटीटीवर एका चित्रपटाचा चांगलाच जलवा पाहायला मिळतोय. बॉक्स ऑफिसवर ३०० टक्क्यांहून जास्त कमाई केली आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई केल्यानंतर आता तो ओटीटीवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाचं नाव ‘थलायवन थलायवी’ असं आहे.

‘थलायवन थलायवी’ हा विजय सेतुपती व नित्या मेनन यांचा रोमँटिक कॉमेडी कौटुंबीक चित्रपट आहे. पंडिराज यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य करतो. यात रोमान्स, ड्रामा, अॅक्शन व कॉमेडीचा मिलाफ पाहायला मिळतो.

सिनेमाची कथा

थलायवन थलायवी या तमिळ चित्रपटाची कथा अगासवीरन (विजय सेतुपती) आणि पेरारसी (नित्या मेनन) यांच्याभोवती फिरते. सुरुवातीला आलेल्या अडचणींनंतर, दोघेही त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीने लग्न करतात. अगासवीरन कमी शिक्षित आहे आणि त्याच्या कुटुंबाबरोबर मिळून स्वतःचे हॉटेल चालवतो. दुसरीकडे, पेरारसी पोस्ट ग्रॅज्युएट असते.

दोघांमध्ये लग्नाआधी व नंतर खूप प्रेम असतं, पण नंतर त्यांच्या आयुष्यात चढ-उतार येऊ लागतात. दोघांमध्ये भांडणं होतात आणि ती दिवसेंदिवस वाढतच जातात. यानंतर वैतागून पेरारसी माहेरी निघून जाते. नंतर दोघांच्या कुटुंबाचे वाद होतात.

प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग आहे सिनेमा

या चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवरही ट्रेंडिंग आहे. नित्या मेनन व विजय सेतुपतीचा ‘थलायवन थलायवी’ २२ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. ‘थलायवन थलायवी’ चित्रपट टॉप 10 सिनेमांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.

जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल तर काळजीचं कारण नाही. आता तुम्ही OTT वर घरी बसून आरामात तो पाहू शकता. विजय सेतुपतीचा हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर हिंदी भाषेत देखील उपलब्ध आहे. ‘थलायवन थलायवी’ ने बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली आहे.

विजय सेतुपती व नित्या मेनन यांचा ‘थलायवन थलायवी’ हा चित्रपट २५ कोटी रुपये खर्चून करण्यात आला होता. त्याने जगभरात १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या तमिळ चित्रपटाने बजेटपेक्षा ३१६.६७ टक्के जास्त नफा कमावला आहे, म्हणजेच त्याला खर्चाच्या ४ पट जास्त परतावा मिळाला आहे.