scorecardresearch

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘लिओ’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

चांगली बाब म्हणजे हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा सगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे

leo-ott
फोटो : इंडियन एक्सप्रेस

अखेर चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. थलपथी विजय, संजय दत्त आणि त्रिशा यांच्या बहुचर्चित ‘लिओ’ ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने जगभरात ६०३.०४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर देशात ३३९.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली मूळ तमिळमध्ये बनलेला ‘लिओ’ या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून ‘लिओ’च्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. सर्वप्रथम हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर १६ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. पण आता सोमवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडियावरील घोषणेमुळे याची पुष्टी झाली आहे की या आठवड्यातच नेटफ्लिक्सवर लिओचे स्ट्रीमिंग सुरू होईल.

tejas-trailer
Tejas Trailer: “ये वो भारत है…” कंगना रणौतच्या ‘तेजस’चा ट्रेलर प्रदर्शित; दमदार भूमिकेत दिसणार बॉलिवूडची ‘क्वीन’
wahida rehman
गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?
Gautami-Patil
लावणीने प्रेक्षकांना घायाळ करणारी गौतमी पाटील चित्रपटांमध्ये काम करणार का? उत्तर देत म्हणाली…
oppenheimer-ott-release
नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?

आणखी वाचा : Animal Trailer: ठरलं! ‘या’दिवशी येणार रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर; दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची पोस्ट व्हायरल

चांगली बाब म्हणजे हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा सगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच आपल्याला आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ‘लिओ’ भारतात २४ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे तर बाहेरील देशात २८ तारखेपासून प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. असा निर्णय का घेण्यात आला आहे याचं अद्याप स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

तमिळ भाषिक राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये हा चित्रपट १५० चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘लिओ’ हा एक जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरला. यामागे थलपथी विजयचे फॅन फॉलोइंग हे एक प्रमुख कारण असले तरी दुसरे प्रमुख कारण म्हणजे हा चित्रपट लोकेश कनागराज सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजेच LCU चा एक भाग आहे. याआधी या फ्रँचायझीचे पहिले दोन चित्रपट ‘कैथी’ आणि ‘विक्रम’ प्रदर्शित झाले आहेत. ‘लिओ’मध्ये विजय मुख्य भूमिकेत असून, त्याच्याबरोबर संजय दत्त नकारात्मक भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात त्रिशा कृष्णन, गौतम वासुदेव मेनन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान आणि प्रिया आनंद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thalapathy vijays leo will release on netflix on this date avn

First published on: 20-11-2023 at 18:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×