Thriller movies on Netflix : तुम्हाला जर अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स आणि ट्विस्ट असलेले चित्रपट पाहायला आवडत असतील तर नेटफ्लिक्सवर तुमच्यासाठी अनेक सिनेमे उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सवरील अशाच ५ बेस्ट सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. या प्रत्येक चित्रपटांमध्ये भरपूर सस्पेन्स पाहायला मिळेल. तुम्ही हे चित्रपट तुमच्या कुटुंबासह, मित्रांसह आणि जोडीदारासह पाहू शकता.
द किलर
The Killer on Netflix : जेव्हा एखादा हल्लेखोर कामात गडबड करतो, तेव्हा काय होतं? हे या चित्रपटात पाहायला मिळतं. डेव्हिड फिंचर दिग्दर्शित हा चित्रपट एका प्रोफेशनल किलरवर आधारित आहे. या चित्रपटातील दृथ्ये, सस्पेन्स सगळं डोकं चक्रावणारं आहे. मायकल फासबेंडरने द किलरमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. हा चित्रपट हिंसाचाराची भयानक कहाणी दाखवतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील आतापर्यंतच्या सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलरपैकी एक आहे.
जाने जान
Jaane Jaan on Netflix: या यादीत करीना कपूर, जयदीप अहलावत, विजय वर्मा यांचा ‘जाने जान’ हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेमींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा चित्रपट एका शांत शहरात घडतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तुम्हाला या चित्रपटात एकच प्रश्न पडेल की आरोपी नेमका कोण आहे? सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट केइगो हिगाशिनो यांच्या २००५ च्या जपानी कादंबरी ‘द डेव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’वर आधारित आहे.
नाऊ यू सी मी 2
Now You See Me 2 : या हाय-स्टेक थ्रिलरमध्ये खूप ट्विस्ट येतात. हा चित्रपट गोंधळून टाकणारा आहे. यातील मजेदार ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. जसं दिसतं तसं नसतं, असं या चित्रपटात पाहायला मिळतं.
देवा
मुंबईतील या थ्रिलर चित्रपटात खून आणि सस्पेन्सची कहाणी आहे. एसीपी देव अंब्रेच्या भूमिकेत शाहिद कपूरने त्याच्या जवळच्या पोलीस मित्राच्या हत्येचे गूढ उकलतो, पण एका जीवघेण्या अपघातामुळे तो सगळं विसरतो. या प्रकरणाचा तपास करताना नंतर त्यात एक वेगळंच वळण येतं. शाहिदच्या या क्राईम थ्रिलर चित्रपटाचं खूप कौतुक झालं.
आय केअर अ लॉट
I Care a Lot on OTT : हा एक उत्तम थ्रिलर चित्रपट आहे, जो विश्वासघातावर आधारित आहे. यात कोर्टरूम ड्रामा आणि अनेक मजेदार ट्विस्ट देखील आहेत. जर तुम्हाला असे सस्पेन्स थ्रिलर सिनेमे पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.