तुम्हाला मिस्ट्री व थ्रिलर चित्रपट आवडत असतील, तर गेल्या आठवड्यात रिलीज झालेला हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला हवा. हा चित्रपट भारतीय नाही, कोरियन आहे. या चित्रपटाची कथा खूप साधी आहे, पण त्यातील सस्पेन्स जबरदस्त आहे.

‘वॉल टू वॉल’ (Wall to Wall on Netflix) असे या चित्रपटाचे नाव आहे. १ तास ५८ मिनिटांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे चित्रपटाची कथा. नेटफ्लिक्सवर ‘वॉल टू वॉल’ चित्रपट धुमाकूळ घालतोय. एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर बेतलेली या चित्रपटाची कथा आहे.

घराच्या भिंतींमधून येतात विचित्र आवाज

वू सुंग दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये नोकरी करतो. त्या आयुष्यात अनेक समस्या असतात. तो गावातले त्याचे शेत विकतो आणि एका इमारतीत घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतो. आता त्याचे आयुष्य सुरळीत होईल, असा तो विचार करतो. पण घडतं भलतंच. त्याच्या घराच्या भिंतींमधून विचित्र आवाज येतात. या आवाजाचा त्याला प्रचंड त्रास होतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो रात्री डिलिव्हरीचे काम करतो. पण घराच्या भिंतींमधून येणारे आवाज बंद होत नाहीत.

विचित्र आवाजांमुळे वू सुंगला झोप येत नाही. तो त्या घरात राहूच शकत नाही. तो त्याच्या घराच्या भिंतींमधून येणाऱ्या आवाजामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो कोणालाही पकडू शकत नाही. आवाज करणाऱ्या व्यक्तीबद्दलचा सस्पेन्स वाढत जातो आणि शेवटी तो आवाज करणाऱ्याला शोधून काढतो. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे आणि कलाकारांचा अभिनयही उत्तम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा ट्रेलर

चित्रपट काही वेळा क्लिष्ट, ताणलेला वाटतो. चित्रपटाची कथा खूप संथ आहे, त्यामुळे काही क्षणांसाठी कंटाळवाणी वाटते, पण जेव्हा सस्पेन्स उत्तम असतो तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. चित्रपटातील थ्रिल तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. हा चित्रपट किम ताए-जून आणि शेरोन एस. पार्क यांनी दिग्दर्शित केला आहे आणि मुख्य भूमिका कांग हा-न्यूल या अभिनेत्याने साकारली आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात सिओ ह्यून वू देखील आहे.