सध्या सोशल मीडियावर हंसिका मोटवानी आणि सोहेल खातुरिया यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हंसिकाने त्यांचे हे गोड गुपित चाहत्यांना सांगितले. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने एंगेजमेंटची घोषणा केली. या फोटोंमध्ये सोहेल तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोझ करताना दिसत आहे. त्याने या सुंदर क्षणांसाठी पॅरिसमधील आयफल टॉवरही जागा निवडली होती. हंसिकाच्या या घोषणेनंतर तिने शेअर केलेले फोटो प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे असे म्हटले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील मुंडोता या ४५० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये ते लग्न करणार आहेत. २ डिसेंबर रोजी सूफी नाईट, ३ डिसेंबर रोजी मेहंदी आणि ४ डिसेंबर रोजी भव्यदिव्य लग्नसोहळा असा एकूण कार्यक्रमाचा आराखडा आहे. लग्नानंतर तेथे पोलो मॅच आणि कसिनो थीम असलेल्या आफ्टर पार्टीचे आयोजन केले जाणार आहे. या समारंभाला त्यांच्या परिवारातील सदस्यांसह सिनेसृष्टीतील दिग्गज हजेरी लावणार आहे. उद्योगजगतातले सोहेलचे मित्रही तेथे उपस्थित राहणार आहेत. एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाचे लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा केले जाणार आहे असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – “दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटामुळे कधीही…” ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर चिन्मय मांडलेकरची सावध प्रतिक्रिया

याबद्दल त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसल्याने ही गोष्ट कितपत खरी आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हंसिका मोटवानीचा होणारा पती सोहेल खातुरिया मुंबईचा आहे. तो एक उद्योजक असून मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत आहेत. ते दोघे बिझनेस पार्टनर्सही आहेत. एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – Video : दोन वर्षात दुसऱ्यांदा आई झालेल्या देबिना बॅनर्जीने लेकीचा रुग्णालयातील व्हिडीओ केला शेअर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ मध्ये सोहेलचे पहिले लग्न रिंकी बजाजशी झाले होते. गोव्यामध्ये त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केले होते. या लग्नात हंसिका मोटवानीदेखील हजर होती. सध्या सोशल मीडियावर सोहेल आणि रिंकीच्या लग्नामधला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हंसिका डान्स करताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी रिंकी आणि सोहेल यांचा घटस्फोट झाला.