नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेला ‘हड्डी’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी झी 5 वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे. तर, यात अभिनेता झीशान अय्युबदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात त्याने नवाजच्या प्रियकराची भूमिका केली आहे. या दोघांचे चित्रपटात रोमँटिक सीनही आहेत. हे सीन शूट करतानाचा अनुभव झीशानने सांगितला आहे.
चाहत्याने थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली तुलना, गश्मीर महाजनी म्हणाला, “माझ्यात त्यांच्या…”
‘हड्डी’साठी होकार देण्यामागचं कारण सांगत झीशान म्हणाला, “मला माझ्या व्यक्तिरेखेला समजून घेणं हे सर्वात कठीण काम वाटतं. चित्रपटातील माझे पात्र एनजीओ चालवते, तो वकील आहे…त्याची स्वतःची लढाई आहे…तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा प्रियकर आहे. त्याच्या प्रेमात आहे. या व्यक्तिरेखेबाबत माझ्या मनात होतं की हा माणूस अगदी सामान्य दिसावा. जणू काही तो आपल्यापैकीच एक आहे असं तुम्हाला वाटायला हवं. तो ऑफिस, मेट्रो अशा ठिकाणी दिसतो. पात्र अतिशय साधे आहे, ज्याकडे लक्ष दिले जात नाही.”
पुढे झीशान म्हणाला, “या व्यक्तिरेखेपासून माझं वेगळेपण असं आहे की एका तृतीयपंथीयाला प्रेमासाठी कसं अप्रोच करायचं, हे मला पूर्वी माहीत नव्हतं, आता मला समजलं आहे. प्रेम ही शारीरिक गोष्ट नाही हे मला समजलं आहे. तुम्हाला त्या माणसाचा आत्मा आवडतो. जर मी काही न बोलता एखाद्यासोबत एक तास घालवू शकलो तर याचा अर्थ असा की बॉन्डिंग खूप चांगली आहे.”
नवाजबरोबर रोमान्स करण्याच्या अनुभवाबद्दल झीशान म्हणाला, “सेटवर तो अनेकदा म्हणायचा, ‘चल एक कोपरा शोधू’. आमच्यातील एक साम्य म्हणजे आम्ही दोघेही एनएसडीचे (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) होतो. आम्हा दोघांचं काम अगदी सहज होत होतं. आमचा पहिला सीनही अशाच पद्धतीने शूट करण्यात आला होता, जिथे आम्ही लग्न करत होतो. हे कोर्ट मॅरेज आहे आणि तुम्हा दोघांचं लग्न होतंय, इतकीच माहिती आम्हाला देण्यात आली होती. आम्ही तिथे अॅक्शन-रिअॅक्शन अगदी नैसर्गिक पद्धतीने करत होतो. आम्हाला काहीच सांगितलं गेलं नाही, तिथूनच केमिस्ट्री तयार होऊ लागली. मला मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी त्याने (नवाजुद्दीन सिद्दीकीने) कंफर्टेबल केलं, खरं तर त्याने माझं पात्र खूप सोपं केलं,” असं झीशान ‘आज तक’शी बोलताना म्हणाला.