बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, स्टाइल दीवा सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या ‘पॅडमॅन’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल चर्चांना सुरुवात झाली. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना निर्मिती करत असलेला ‘पॅडमॅन’ चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल. आर बल्की दिग्दर्शित या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. कॉमेडी-ड्रामापट असलेला ‘पॅडमॅन’ चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या जीवनावर आधारित आहे.

VIDEO : अप्सरा आली..

अक्षयने पॅडमॅनचे दुसरे पोस्टर ट्विटरवर शेअर केले असून, ‘सुपर हिरो है ये पगला, आ रहा है २६ जनवरी २०१८ को #PadMan’ असे कॅप्शन दिले आहे. अक्षयने लिहिलेलं हे कॅप्शन चित्रपटाची टॅगलाइन आहे. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापसाच्या ढिगाऱ्यामध्ये उभा असलेला ‘पॅडमॅन’ या पोस्टरमध्ये पाहावयास मिळतो.

सिने’नॉलेज’ : ऐश्वर्या रायचा पहिला चित्रपट कोणता?

मासिक पाळी हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब आहे. मात्र, याच विषयावर अक्षयचा चित्रपट भाष्य करणार असल्यामुळे त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. अरुणाचलम् मुरुगानंदम् यांनी स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगारही मिळवून दिला. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत कटू, कठीण अनुभवांना सामोरे जात त्यांनी तयार केलेल्या या मशीन्स आज परदेशातही नावाजले जात आहेत. स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना चित्रपटात पाहता येणार आहे.