भारतीय सिनेसृष्टीत जगभरातील कलाकार काम करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटांमध्ये सातत्याने दिसायचे. फवाद खान व इम्रान अब्बास ही त्यातलीच नावं आहेत. पाकिस्तानी मालिकांसाठी लोकप्रिय असलेला इम्रान करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्कील’ सह काही हिंदी चित्रपटात झळकला होता. आता, एका नवीन मुलाखतीत इम्रानने दावा केला आहे की त्याला ‘आशिकी २’ मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. तसेच त्याला राजकुमार हिरानींच्या ‘पीके’मध्ये सरफराजची भूमिका देखील ऑफर करण्यात आली होती. ही भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केली होती.

एआरवायच्या शान-ए-सुहूरला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने बॉलीवूडमधून त्याला मिळालेल्या संधींबद्दल सांगितलं. “आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं की मी आशिकीसारखा चित्रपट सोडला होता. सगळे म्हणतात, ‘तू आशिकी सोडलास? एवढा मोठा चित्रपट.’ अगदी पीकेमध्येही सरफराजची भूमिका ऑफर झालेली, ती सोडली. संजय लीला भन्साळींची हीरामंडी… त्यांना मी नकार दिला नाही पण त्यावेळी तो प्रोजेक्ट रखडला होता. ‘गुजारिश’मध्येही मला आदित्य रॉय कपूरची भूमिका ऑफर करण्यात आली होती,” असं इम्रान म्हणाला.

kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार
actor rohan patil who played role of manoj jarange share experiences during movie to media representatives
मनोज जरांगेची भूमिका करणारा अभिनेता म्हणाला ” दोनच दिवस उपाशी…”
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
Sanskruti Balgude is a fan of siddharth menon will work together in a film
संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

‘आशिकी २’ बद्दल इम्रान अब्बास म्हणाला, “आशिकी २ हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. आता बरेच जण म्हणतात की त्यांना आशिकीची ऑफर मिळाली होती पण तुम्ही महेश भट्ट यांना विचारा. त्यांनी आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांनी अधिकृत ऑफर दिलेला मी एकमेव अभिनेता होतो. लोक मला म्हणतात, ‘तू हे काय केलं? तो इतका मोठा चित्रपट होता आणि तू केला नाहीस, उलट तू त्यावेळी केला तो हिट झाला नाही.’ पण आता असं बोलून मला निराश करू नका, कारण त्याचा काहीच फायदा नाही.”

“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

इम्रानचा पहिला भारतीय चित्रपट २०१४ मध्ये आलेला क्रिएचर थ्रीडी होता, ज्यात बिपाशा बसू होती. मग २०१५ मध्ये आलेल्या ‘जानीसार’ या चित्रपटातही त्याने काम केलं होतं. ‘ए दिल है मुश्कील’मध्ये इम्रानने अनुष्का शर्माचा बॉयफ्रेंड फैजलची भूमिका साकारली होती.