पाकिस्तानी अभिनेत्री व मॉडेल अनिता अयूब यांनी ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटात बॉलीवूडचे अभिनेते देव आनंद यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

अनिता अयूब यांनी देव आनंद यांच्या ‘प्यार का तराना’ (१९९३) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ही अभिनेत्री देव आनंद यांच्याबरोबरच्या त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत होती.

त्यानंतर १९९५ मध्ये अनिता पुन्हा देव आनंद यांच्याबरोबर ‘गँगस्टर’ चित्रपटात दिसल्या. त्यांनी वारंवार एकत्रित केलेल्या कामामुळे त्या काळात खूप चर्चा झाली की, ते दोघे प्रेमसंबंधात तर नाहीत ना?

आता,अनिता यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांनी देव आनंद यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल काही खुलासे केले होते. ‘लहरें’शी झालेल्या त्या संभाषणात त्यांनी देव आनंद यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, “माझे त्याच्याशी एक मोठा भाऊ, एक वडील, एक प्रियकर, एक आई अशा सर्व प्रकारचे नाते होते आणि त्यामुळे आमचे नाते खूप चांगले होते.”

“आम्ही चार आठवडे एकत्र राहिलो”: अनिता अयुब

अभिनेत्रीने देव आनंद यांच्याबरोबर डेन्मार्कमध्ये एकत्र राहत असल्याचा दावा केला होता. “आम्ही चार आठवडे एकत्र राहिलो, ते तिसऱ्या मजल्यावर होते आणि मी दुसऱ्या मजल्यावर. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकत्र राहता, दररोज सकाळी एकमेकांना भेटता आणि संपूर्ण दिवस एकत्र घालवता, तेव्हा तुम्हाला आपोआपच एखाद्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळते. मला त्यांना माझा प्रियकर, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ… सर्व काही म्हणून निवडण्यात काहीच अडचण आली नाही.”

देव आनंद यांचा अतुलनीय वारसा भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेली एक अमूल्य भेट आहे. सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक असण्याबरोबरच नवीन कलाकारांना शिकवण्यासाठी आणि उद्योगातील अनेकांना नवीन दिशा देण्यासाठी ओळखले जात होते. अभिनेता व मार्गदर्शक म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

अनिता यांच्याबाबदल बोलायचे झाले तर, त्या दिसायला खूप सुंदर होत्या आणि अभिनयही चांगला करीत होत्या. त्यामुळे त्यांना अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली. पण, त्यांच्या करिअरपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्या अधिक चर्चेत राहिल्या. अनिता अयूब यांनी भारतीय उद्योजक सौमिल पटेल यांच्याशी लग्न केले आणि काही काळ त्या न्यूयॉर्कमध्ये राहिल्या. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. अनिता यांनी दुसरे लग्न पाकिस्तानी व्यापारी सुबक मजिद याच्याशी केले. सध्या त्या सर्वच ग्लॅमरपासून दूर साधे जीवन जगत असून, एकांतवासात असल्याची चर्चा आहे.