पाकिस्तानी आणि भारतीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र या लेस्बियन जोडप्याने ब्रेकअपची घोषणा केली आहे. काही दिवसांनी दोघींचं लग्न होणार होतं. पण आता त्यांनी लग्न होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. दोघींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याचा निर्णय सांगितला आहे. सुफीने केलेल्या फसवणुकीमुळे हे लग्न मोडत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुफी व अंजली या समलिंगी जोडप्याने २०१९ मध्ये पारंपरिक पोषाख परिधान करून त्यांचे फोटो शेअर केले होते. दोघींनी त्यांच्या नात्याची इन्स्टाग्रामवर कबुली दिली होती. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असायचे. दोघांच्या नात्याला पाच वर्षांहून अधिक काळ झाला होता व त्या लवकरच लग्न करणार होत्या, पण सुफीने फसवणूक केल्याने हे लग्न मोडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुफीनेही तिच्या पोस्टमध्ये स्वतःच्या चुकीचा उल्लेख केला आहे.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

“मी आणि सुफीने पाच वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवला. यादरम्यान तुम्हा सर्वांचंही खूप प्रेम आम्हाला मिळालं. तुम्हाला हे ऐकून धक्का बसू शकतो, पण आता आम्ही दोघी आमचे मार्ग वेगळे करत आहोत. सुफीने केलेल्या बेवफाईमुळे आम्ही आमचे लग्न रद्द करण्याचा आणि आमचे रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी पोस्ट अंजलीने केली आहे. सुफीची चूक असली तरी तिच्याबद्दल नकारात्मकता व द्वेष पसरवू नका, असं अंजलीने म्हटलं आहे.

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

सुफीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “मी आमच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी तिची फसवणूक करून तिचा विश्वासघात करून चूक केली. मी तिला खूप दुखावलं आहे. मला माझी चूक मान्य आहे आणि भविष्यातही मी ती चूक मान्य करेन. मी जिच्यावर सर्वात जास्त प्रेम करते तिचंच मन मी दुखावलं. मी जिची सर्वात जास्त काळजी घेते तिचाच मी विश्वासघात केला. मी आमच्या जवळच्या लोकांना व आमच्या कम्युनिटीच्या लोकांनाही दुखावलं आहे. इतके वर्ष आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुफी मलिक आणि अंजली चक्र यांची पहिली भेट कॅलिफोर्नियातील टम्बलरवर झाली होती. अंजली एक इव्हेंट प्लॅनर आहे, तर सुफी कलाकार आहे. सूफी ही पाकिस्तानी मुस्लीम असून अंजली भारतीय हिंदू आहे. पाच वर्षांहून जास्त काळ एकत्र घालविल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.