जगभरात बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होत आहे, दिग्दर्शक राजामौली यांचा ‘RRR’ चित्रपटाची हवा जगभरात आहे. ज्याप्रमाणे भारतातील चित्रपटांची हवा आहे त्याचपद्धतीने आता पाकिस्तानी चित्रपटांची चर्चा जगभरात होत आहे. आता हाच पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमसच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी कलाकारांनी आपलट अभिनयाची बॉलिवूडमध्ये दाखवली आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खानचे आज भारतात ही चाहते आहेत. त्याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १० मिलियन डॉलर्स इतकी कमाई केली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी हा भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चित्रपट सर्कस ला टक्कर देईल का हे कळलेच.

Photos : २०० कोटींची कमाई करणारे ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट; तुम्ही पाहिलेत का?

फवाद खानने २०१७ मध्ये ‘खूबसूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. त्याचा द लीजेंड ऑफ मौला जट हा चित्रपट पाकिस्तानातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट १९७९ साली आलेल्या ‘मौला जट’ या चित्रपटाचा रिमेक आहे.

२०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली. आजतागायत ही बंदी सुरु आहे. त्यामुळे या हा पाकिस्तानी चित्रपट कितपत यशस्वी ठरेल हे बघावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani film the legend of maula jatt will be releasing in india during christmas spg
First published on: 04-12-2022 at 12:13 IST