scorecardresearch

पाकिस्तानी अभिनेत्याला मुंबईच्या वडापावची भुरळ; म्हणाला, “माझ्या बायकोला…”

दुसरीकडे काहींनी बॉलिवूडवर पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे

पाकिस्तानी अभिनेत्याला मुंबईच्या वडापावची भुरळ; म्हणाला, “माझ्या बायकोला…”
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

मुंबईकरांचा वडापाव म्हणजे जीव की प्राण, या पदार्थाला महाराष्ट्रातच नव्हे तर आता जगभरात ओळख मिळाली आहे. हा पदार्थ मूळचा मुंबईचा असला तरी आज तो अनेक ठिकाणी मिळतो. सामान्य माणसांप्रमाणे अगदी सेलिब्रेटी लोकांनादेखील हा पदार्थ प्रिय आहे. शाहरुख खानपासून ते श्रद्धा कपूरपर्यंत अनेक सेलिब्रेटी वडापावचे चाहते आहेत. बॉलिवूडप्रमाणे आता पाकिस्तानी कलाकरांनादेखील या पदार्थाची भुरळ पडली आहे.

कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री भारती सिंग चर्चेत असते. दुबईमध्ये आयोजित केलेल्या फिल्मफेअर मिडल ईस्ट पुरस्कार सोहळ्यात तिने सुत्रसंचालकाची भूमिकेत दिसली. या कार्यक्रमात तिने पाकिस्तानी अभिनेता हुमायून सईदबरोबर मज्जा मस्ती केली. तेव्हा भारतीने त्याला काही प्रश्न विचारले. त्यानंतर भारती असं म्हणाली, तिला आणि तिच्या पतीला पाकिस्तानी जेवण आवडते. यावर हुमायुन म्हणाला, त्याला मुंबईचे जेवण खूप आवडते. तो म्हणतो- “मी पण भारतात जाणार आहे आणि माझ्या बेगमला मिठीबाई कॉलेजसमोर मिळणारा वडापाव खूप आवडतो.”

दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. दुसरीकडे काहींनी बॉलिवूडवर पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी कलाकारांवर सध्या देशात बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 16:33 IST

संबंधित बातम्या