बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. कुटुंबियांसोबत परिणीती सध्या वेळ घालवत असून या खास ट्रीपचे फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतेय. नुकताच परिणीतीने लाल रंगाच्या बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. परिणीतीचा हा बोल्ड लूक चांगलाच व्हायरल होत असून या फोटोवर परिणीतीची बहीण आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने हटके कमेंट केली आहे.

परिणीतीने शेअर केलेल्या फोटोत ती मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर लाल रंगाची बिकिनी परिधान करून निवांत बसल्याचं दिसतंय. या फोटोत परिणीतीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “सनबर्न” असं लिहिलं आहे. परिणीतीच्या या फोटोला अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीदेखईल पसंती दिली आहे. मात्र तिच्या फोटोवर प्रियांका चोप्राने केलेल्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नागा चैतन्यबद्दल ही गोष्ट समजल्याने आमिर खानसमोरच नागार्जुन झाले भावूक; ‘हे’ आहे कारण

प्रियांकाने कमेंट करत म्हंटलं, ” अह्… कदाचित इंस्पायर्ड आहे वाटतं?” तर यावर परिणीतीने देखील प्रियांकाला उत्तर दिलं आहे. “कदाचित नाही, नक्कीच!” असं म्हणत परिणीतीने प्रियांकमुळे प्रभावित होत पोस्ट शेअर केल्याचं मान्य केलंय.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने पती निक जोनाससोबत समुद्रावरील बिकिनीतल एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर परिणीती चोप्राने केलेल्या धमाल कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘प्रियांका ताई, तुमचं हे काय चाललं आहे? इन्स्टाग्रामवर कुटुंबातील माणसंदेखील आहेत, डोळे बंद करत फोटोला लाइक करण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशी कमेंट परिणीतीने केली होती.