‘पटियाला बेब्स’ फेम अशनूर कौर बारावी पास; मिळवले इतके टक्के

म्हणाली, ” यासाठी मी कोणतेच प्रोजेक्ट साईन केले नव्हते….”

ashnorr-kaur

‘पटियाला बेब्स’ फेम अशनूर कौर ही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत येत असते. अभिनय आणि फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेचा हिस्सा बनत असते. परंतु आज ती सीबीएसई बारावीच्या निकालामुळे चर्चेत आलीय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसई बारावीच्या परिक्षेत तिला मिळालेल्या यशामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

अशनूर कौरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोमध्ये ती कूल लुकमध्ये व्हिक्टरी साईन दाखवताना दिसत आहे. या फोटोसोबतच तिने बारावीत उत्तम गुण मिळवल्याबद्दल सांगितलं. यात तिने लिहिलं, “आणि ९४ टक्के मिळाले…#12thboards, परिपूर्ण असल्यासारखं वाटतंय…मी स्वतःला, माझ्या जवळच्या माणसांना आणि प्रियजनांना निराश केलं नाही…कठोर मेहनत फळाला आली…मला फक्त इतकंच म्हणायचंय की, जिथे इच्छा तिथे मार्ग…तिथे कायम कायम मार्ग सापडतोच.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashnoor (@ashnoorkaur)

अशनूर कौरने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलाय. मालिकेमधून मिळालेली प्रसिद्धीत हरवून न जाता अशनूरने बारावीत ९४ टक्के मिळवले. तिची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय. पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या १५ मिनीटांत १९ हजार पेक्षा जास्त जणांनी लाइक्स केले आहेत.

आणखी वाचा: आता CBI न्यायालयात होणार जिया खान मृत्यू प्रकरणाची सुनावणी; आठ वर्षापासून प्रलंबित होतं प्रकरण

याविषयी माध्यमाशी बोलताना अशनूर म्हणाली, “खूप आनंद होतोय…१२ वी च्या परिक्षेत उत्तम मार्क्स मिळवायचे हे मी आधीपासून ठरवलं होतं. त्यासाठी मी कोणतेच प्रोजेक्ट साईन केले नव्हते. कारण मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. अखेर मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले.” अशनूरला जेव्हा तिला करिअरबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, “मला बीएमएमचा कोर्स करायचा आहे. मास्टर्सच्या पदवीसाठी मला विदेशात शिकण्यासाठी जायचंय. अभिनयाच्या व्यतिरिक्त फिल्ममेकिंग आणि डायरेक्शन सुद्धा शिकायचंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashnoor (@ashnoorkaur)

अशनूरने नुकतंच मुंबईत एक घर बुक केलंय. तिच्या या नव्या घराचं काम देखील सुरूय. अशनूर तिच्या या नव्या घराला ‘स्वप्नातलं घर’ असं म्हणते. पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत या घराचं काम पूर्ण होणार आहे. ती सध्या तिच्या नव्या घरी शिफ्ट झाली असून अद्याप मात्र खरेदी केलेलं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Patiala babes actress ashnoor kaur scores 94 percent in cbse 12th board exams says hard work paid off prp