बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमुळे सध्या चर्चेत आहे. शो सुरु होण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या शोचे सुत्रसंचालन कंगना करत आहे. शोच्या पहिल्याच दिवशी कंगनाचा अनेक स्पर्धकांशी वाद झाला. अभिनेत्री पायल रोहतगीसोबत आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटापर्यंत अनेक गोष्टींवर वाद झाला आहे.
या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात कंगना आणि पायलमध्ये वाद झाल्याचे दिसते. यावेळी पत्रकारांनी पायलला प्रश्न केला की “Alt बालाजी हा सेमी पॉर्न प्लॅटफॉर्म आहे असं वक्तव्यं तू केलं होतसं आणि आज तू त्याच्या शोचा भाग आहेस?” यावर पुनमने हटके अंदाजात उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
पायल म्हणाली, “काही वर्षांपूर्वी कंगनाचा एकताकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. पण आज ‘लॉक अप’ हा शो एकता कपूरने प्रोड्यूस केला आणि ती कंगना होस्ट आहे.” यावर कंगनाने पायलला तिचे उदाहरण न देता थेट प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. यावर पायल म्हणाली, “ती कंगनाच्या उपस्थितीत हे सगळं बोलत आहे.” कंगनाच्या जागी दुसरं कुणी असतं तर तिने दुसऱ्याचं उदाहरण दिलं असतं. कंगनाने पायलला सांगितले की, “तू स्वतःबद्दल नाही तर इतरांबद्दल बोलत आहेस.”
आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
यावर पायल म्हणाली, “तू पण तर आलिया भट्टबद्दल बोलली होतीस.” कंगना म्हणाली की, “तू तुझ्या कॉन्ट्रोवर्सी बोलतोस. त्यावर पायलने उत्तर दिले की, तू पण तर ‘गंगूबाई काठियावाडी’याचे नाव घेतले, ही तुझी कॉन्ट्रोवर्सी नव्हती.”