scorecardresearch

Video: …अन् भर कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्यावर फेकली चप्पल; नेमकं काय घडलं?

१० वर्षांपूर्वी पत्नीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती.

Video: …अन् भर कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्यावर फेकली चप्पल; नेमकं काय घडलं?
फोटो सौजन्य : Twitter scree shot

दाक्षिणात्य अभिनेते कायमच चर्चेत असतात. आपल्या स्टाईल आणि अभिनयनाने ते कायमच प्रेक्षकांची मन जिंकत असतात. मात्र हेच प्रेक्षक कधी कधी अभिनेत्यांवर आपला संतापदेखील व्यक्त करत असतात. कन्नड अभिनेता दर्शन नुकताच एक कार्यक्रमात उपस्थित राहिला असताना त्याच्यावर प्रेक्षकांकडून चप्पल फेकण्यात आली होती.

दर्शन कर्नाटकमधील हॉस्पेटे येथे आपल्या गाण्याच्या प्रमोशनसाठी गेला असताना हा प्रकार घडला. त्याच्या आगामी ‘क्रांती’ चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशनसाठी गेला होता. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहेत ज्यात एक अज्ञात व्यक्ती अभिनेत्यावर चप्पल फेकताना दिसत आहे. अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर पोलीस दर्शनाच्या आसपास दिसत होते.

‘बेशरम रंग’ गाण्यावर पूनम पांडेच्या बोल्ड अदा; पार्टीतला व्हिडीओ व्हायरल

या हल्ल्यामागे अनेक तर्क लावले जात आहेत. यातील एक तर्क म्हणजे क्रांती चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात दर्शनने “नशीब देवी” बाबत अश्लील टिप्पणी केली होती. तसेच दर्शन याआधी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १० वर्षांपूर्वी पत्नीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती.

दर्शनचा ‘क्रांती’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही हरिकृष्णा यांनी केले आहे. या चित्रपटात दर्शनाबरोबर अभिनेत्री रचिता राम काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 12:15 IST

संबंधित बातम्या