स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालितेकील जीजी अक्का तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. ‘तुम्हा समद्यांची गीफ्टस् अन् घ्यायला मी एकटी’ या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी ही भूमिका साकारलीय. पण तुम्हाला माहितेय, या मालिकेतील जीजी अक्का म्हणजे अभिनेत्री अदिती देशपांडे या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अतिशय शिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या सासूची भूमिका साकारतेय. या मालिकेतली जीजी अक्काचा कठोरपणा जितका अभिनेत्री अदिती देशपांडेने उतरवलाय तितक्याच सासूमधल्या हळव्यापणाला सुद्धा तितकाच न्याय दिलाय. त्यामूळेच ही जीजी अक्का घराघरात पसंतीस उतरत आहे. अभिनेता अदिती देशपांडेच्या अभिनयाचा आदर्श तिच्या घरातच आहे. कारण ती प्रसिद्ध अभिनेत्री ‘सुलभा देशपांडे’ यांच्या सून आहेत. सुलभाताई देशपांडे या आधी सुलभा कामेरकर होत्या. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याच दरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. जवळपास ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या. रंगभूमीमुळेच सुलभाताईंची भेट अरविंद देशपांडे यांच्यासोबत झाली.

पहिल्या भेटीनंतर दोन वर्षाच्या प्रेमाच्या नात्यात राहिल्या नंतर सुलभाताईंनी अरविंद देशपांडे यांच्यासोबत विवाह केला. लग्न करताना नवरा-बायको एकमेकांना साथ देणार असल्याची वचनं घेतात. पण सुलभाताईंनी लग्न करताना रंगभूमी सोडणार नाही असं वचन घेतलं होतं. त्यांच्या लग्नानंतर १९६७ साली त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव निनाद आहे. निनाद सुद्धा एक अभिनेता आहे. आदिती आणि निनाद यांना मिहीर हा एक मुलगा आहे.

३ जानेवारी १९८७ रोजी पती सुलभाताईंचे पती अरविंद देशपांडे यांचं निधन झालं. पण पतीच्या निधनानंतर त्या न डगमगता पुन्हा धैर्यानं उभ्या राहिल्या आणि रंगभूमी न सोडण्याचं वचन निभवलं. मिसेस तेंडुलकर, विजेता, दुनिया, खून भरी मांग, जादू का शंख, कस्तुरी, अल्पविराम, अस्मिता सारख्या मालिका चित्रपट साकारत तब्बल ३४ पेक्षा जास्त जाहिरातीत काम करून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर बनल्या. अखेर ४ जून २०१६ रोजी सुलभाताई देशपांडे यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phulala sugandh maticha fame jiji akka fame is sulabha deshpandes daughter in law prp
First published on: 16-07-2021 at 20:43 IST