दीपिका पादुकोण आणि इरफान खान यांचा ‘पिकू’ हा सिनेमा आजही अनेकांच्या फेवरेट लिस्टपैकी एक असेल. या सिनेमातली या दोघांची अनोखी केमिस्ट्रीच खूप काही सांगून गेली. ही ‘पिकू’ची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हनी तेहरान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विशाल भारद्वाज आणि क्रिअर्ज एण्टरटेनमेन्ट मिळून करणार आहेत. ‘उडता पंजाब’ सिनेमाद्वारे अभिषेक चौबे या नवीन दिग्दर्शकावर विश्वास दाखवल्यानंतर आता विशाल यांनी अजून एका नवीन दिग्दर्शकावर सिनेमाची धूरा सोपवली आहे. पुढच्या वर्षी २ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल असे सध्या म्हटले जात आहे.

ICC Women’s World Cup 2017: बॉलिवूडच्या या कलाकारांनी दिल्या इंडियन टीमला हटके शुभेच्छा

दीपिका या सिनेमात एका राहिमा खान उर्फ सपना दीदी या लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. राहिमाला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा तिच्या नवऱ्याच्या हत्येचा बदला घ्यायचा असतो. त्यासाठी ती त्याला मारण्याचा प्लॅन बनवते. पण ती असे काही करण्याआधीच अंडरवर्ल्डचा राजा मानल्या जाणाऱ्या दाऊदकडून तिची हत्या केली जाते. अशी या सिनेमाची वरकरणी कथा आहे. एस हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित या सिनेमाची कथा आहे. या सिनेमाचे नाव अजून निश्चित झालेले नाही.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक म्हणाले की, ‘या सिनेमाची कथा विशाल भारद्वाज यांनी लिहिली आहे, त्यांनीच या सिनेमाची निर्मितीही केली आहे. मी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून दीपिका आणि इरफान यांच्या मुख्य भूमिका यात आहेत. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये आम्ही या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करु.’

विशाल भारद्वाज यांच्या सिनेमांचे आशय नेहमीच वेगळे असतात. त्यांनी आतपर्यंत अनेक हटके सिनेमे दिले आहेत. दीपिका आधी हनी या नवख्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास तयार नव्हती. मात्र सिनेमाची कथा ऐकल्यानंतर ती या प्रोजेक्टला नकार देऊ शकली नाही. ‘पद्मावती’ सिनेमाचे चित्रीकरण संपल्यावर ती या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

या अभिनेत्रीमुळेच अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री

‘दीपिका ही एक सशक्त अभिनेत्री आहे. ती एक सुपरस्टार तर आहेच शिवाय उत्तम अभिनेत्रीही आहे. फार कमी लोक सुपरस्टार असण्यासोबत त्यांना अभिनयाचीही जाण असते. दीपिका ही त्यातली एक आहे. त्यामुळे या भूमिकेला दीपिका चांगला न्याय देईल यात काही शंका नाही,’ असे सिनेमाचे निर्माते विशाल भारद्वाज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या दीपिका संजय लीला भंन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे. तिच्या पतीच्या भूमिकेत म्हणजे रतन सिंग याच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार असून अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे.