Piyu Bole Song Video By Swanand Kirkire: विद्या बालन व सैफ अली खान यांच्यावर चित्रित झालेल्या पियू बोले गाण्याची आजही प्रत्येक वयाच्या वर्गात चर्चा आहे. अलगद वाऱ्याची झुळूक यावी असं हे सुंदर गाणं परिणिता या चित्रपटासाठी २००५ मध्ये शूट करण्यात आलं होतं. या चित्रपटातून बॉलिवूडला विद्या बालन सारखी अष्टपैलू अभिनेत्री व या श्रेया घोषाल सारखी हरहुन्नरी गायिका मिळाली होती. अलीकडच्या काळात आपण ज्याला जॅमिंग म्हणतो म्हणजेच चार मित्र/ मैत्रिणी एकत्र येऊन जे गाणं सहज गाऊ लागतात. यामध्ये अगदी शब्दांची सांगड घालण्यापासून ते एखादी लय सुचवून, वाद्याची साथ देण्यापर्यंत सगळं काही एकाच वेळी आणि मुख्य म्हणजे उत्स्फूर्तपणे करणं अपेक्षित असतं. अशाच धाटणीत ‘पियू बोले, पिया बोले, क्या ये बोले जाने ना’ हे गाणं सुद्धा चित्रित झालं होतं.

या गाण्यातील एक कडवं ‘एक नदी से मैने पुछा, ईठलाके चल दी कहाँ’ हे मध्यंतरी रील्स व युट्युबवर सुद्धा खूप चर्चेत होतं. नदीच्या रूपातील एखाद्या प्रेयसीची भावना या शब्दांमध्ये अत्यंत सुंदररित्या मांडली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का याच नदीच्या प्रतीकातून पुढे एक कडवं आणखीनही रेकॉर्ड करण्यात आलं होतं. स्वतः या गाण्याचे गीतकार स्वानंद किरकिरे यांनी एका कार्यक्रमात पियू बोले गाण्याच्या एका कोणीही न ऐकलेल्या कडव्याची गोष्ट सांगितली आहे. किरकिरे सांगतात की, ” ‘एक नदी से मैने पुछा’ याचं एक दुःखी, निराश व्हर्जन सुद्धा रेकॉर्ड करण्यात आलं होतं. ते कधी वापरलंही नाही आणि नंतरही समोर आलं नाही”

स्वानंद किरकिरे यांनी ही गोष्ट सांगताना, कधीच समोर न आलेलं ‘पियू बोले’ गाण्याचं ‘हे’ कडवं गाऊनही दाखवलं, पाहा Video

हे ही वाचा<< बाईपण भारी देवामधील ‘या’ अभिनेत्रीने केली होती दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका; Video पाहा, ओळखलं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांनी व बॉलिवूड प्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आम्हाला हे गाणं या व्हर्जन मध्ये वेगळ्या पद्धतीने पुन्हा ऐकायला आवडेल असंही काहीजण म्हणत आहेत. तब्बल ४५ हजाराहून अधिक लाईक्स व कमेंट्स असणाऱ्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा आहे. तुम्हाला हे व्हर्जन कस वाटतंय कमेंट करून नक्की कळवा.