पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच मुंबईतील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनने पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फोटो कढणं कार्तिकला शक्य झालं नाही. त्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत स्वत:ला लूजर म्हटलं होतं. यावर पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ त्यांची प्रतिक्रिया देत ‘तुम्ही लूजर्स नाही, तर रॉकस्टार आहात’, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अभिनेता अनिल कपूरनेही पंतप्रधानांची भेट घेत याप्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. त्यातच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि कलाकार मंडळींची भेट झाली. या भेटीमध्ये अनेकांनी पंतप्रधानांसोबत फोटो काढले. मात्र कार्तिकला फोटो काढणं शक्य झालं नाही. त्यानंतर कार्तिकने एक फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढणं शक्य न झाल्याचं म्हटलं.

कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिकसोबत चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,दिनेश विजान आणि इम्तियाज अली आहेत. तर फोटोमध्ये चौघांच्यामागे पंतप्रधान मोदी पाठमोरे उभे असल्याचंही पाहायला मिळत आहे.

या फोटोला कार्तिकने ‘माननीय पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या लुजर्सचा मुर्खपणा’, असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कार्तिकला सोशल मीडियावर उत्तर देत पुढच्या वेळी नक्की फोटो काढू असं म्हटलं आहे.

‘तुम्ही लूजर्स नाही,तर रॉकस्टार आहात. यावेळी एकत्र फोटो काढणं शक्य झालं नाही. मात्र पुढच्या वेळी भेट होईल तेव्हा नक्कीच फोटो काढू’, असं उत्तर पंतप्रधान मोदी यांनी कार्तिकला दिल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या उद्धाटन सोहळ्याला पंतप्रधान मोदीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कलाकारांशी चित्रपटसृष्टीतील काही मुद्द्यांवरही चर्चा केली. तसंच  प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अभिनेता जितेंद्र, आमिर खान, मनोज कुमार आणि यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोदींसह फोटो काढत हे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reply on kartik aaryan tweet
First published on: 21-01-2019 at 11:13 IST