Ponniyin Selvan 2 box Office Collection: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला. मागच्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता, तेव्हापासून चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती, त्यामुळे चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. ऐश्वर्या राय व त्रिशाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

हेही वाचापैशांसाठी ‘द कपिल शर्मा शो’ सोडणारा कृष्णा अभिषेक एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या अंदाजांनुसार, पहिल्या दिवशी ‘PS-2’ने सर्व भाषांमध्ये देशभरात ३२ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाची सर्वाधिक कमाई तमिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या भागाच्या तुलनेत पहिल्या भागाने भारतात पहिल्या दिवशी ३४ कोटी रुपये आणि जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या भागाची कमाई पहिल्याच्या तुलनेत दोन कोटी रुपये कमी आहे.

AI Imagination: PM मोदी डॉक्टर, पोलीस किंवा अंतराळवीर असते तर कसे दिसले असते? पाहा Photos

‘कोइमोई’च्या वृत्तानुसार, ‘PS-2’ ने प्रदर्शनापूर्वी ७.६ कोटी रुपयांची अॅडव्हान्स तिकिटं विकली होती. तर, पहिल्या भागाची अॅडव्हान्स बूकिंग १६ कोटी रुपयांची झाली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्यामते PS-2 ची तुलना केजीएफ: चाप्टर २ किंवा बाहुबली २ शी करणं योग्य नाही. कारण त्या दोन्ही चित्रपटांच्या दुसऱ्या भागांइतकी चाहत्यांना PS-2 साठी पुरेशी प्रतीक्षा करावी लागली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पोन्नियिन सेल्वन: २’ मध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट भारतात तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.