मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. नवनवीन कथा आणि ती फुलवण्याची यामुळे अनेक सिनेमे लक्षवेधी ठरतात. नुकताच बस स्टॉप या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आत्ताच्या तरुणाईची प्रेमाची व्याख्या आणि त्याकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोन यावर हा सिनेमा भाष्य करतो.

अभिनेत्री नाही तर कॉमेडियन बनून नाव कमवतेय जॉनी लिवरची मुलगी

मराठीतले अनेक नावाजलेले कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. पुजा सावंत, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, रसिका सुनील, अमृता खानविलकर, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी अशी भली मोठी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित या सिनेमाकडे आता तरुणाईचे लक्ष लागून राहिले आहे. खूप दिवसांनी एक हलकी फुलकी कथा मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा करता येऊ शकते.

कॉलेज तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात दोन पिढ्यांची विचारसरणी आणि जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये केला आहे. कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणं, मैत्री ट्रेलरमध्ये दिसून येत असून, दुसऱ्या बाजुला पालकांची मानसिकतादेखील यात मांडण्यात आली आहे. तरुण मुला-मुलींचे पालक आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला किती पटतात, याचा उहापोह यामध्ये दिसून येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवा पिढी आणि त्यांचे पालक यांच्यातील वैचारिक दरी आणि त्यावरून होणारे वाद अगदी विनोदी ढंगात या ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहे. यातील तरुणाईचे त्यांचे असे अनोखे फंडे आहेत आणि ते त्यांच्या पालकांना मान्य नाहीत. घराघरात होत असलेल्या जनरेशन गॅपच्या कुरघोडी आणि प्रेमाची आजची डेफिनेशन सांगणारा हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तरी जनरेश गॅप भरून निघेल का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/BVRut9GF7KV/