मराठी चित्रपट सृष्टीतील सध्याची आघाडीची नायिका पूजा सावंत खूप आनंदात आहे. याला कारणही तसेच आहे. आकर्षक व्यक्तीमत्वाबरोबरच आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांवर भुरळ घालणा-या पूजाच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. यावर्षी माद्रिदमध्ये होत असलेल्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या पूजा सावंतला बेस्ट लीड एक्ट्रेसचे नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे माद्रिद फिल्म फेस्टिवल च्या भाषिक चित्रपटाच्या यादीत भारतातून एकट्या पूजानेच स्थान मिळवले आहे. ‘लपाछपी’ या मराठी हॉररपट सिनेमातील तिच्या प्रमुख भूमिकेसाठी पूजाला हे नामांकन जाहीर झाले आहे. या नामांकानाविषयी पूजा खूप उत्साही असल्याचे समजते.
‘हे नामांकन माझ्या अभिनय कारकिर्दीतील मोठे यश असल्याचे तिने सांगितले. ‘हि केवळ सुरुवात आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला मिळालेल्या या नामांकनामुळे माझा आत्मविश्वास बळावला असून, मी आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले, असे मी मानते’ असे पूजाने पुढे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2016 रोजी प्रकाशित
Madrid international film Festival : मराठमोळ्या पूजा सावंतची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
भारतातून एकट्या पूजानेच स्थान मिळवले आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 06-05-2016 at 10:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant nominated for best actress at madrid international film festival