दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. तामिळ अभिनेता प्रदीप के विजयन याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तो त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला आहे, त्याच्या डोक्यावर जखमा असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपासून त्याचा मित्र त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या घरी भेट दिली, तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं. अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू आहे.

प्रदीप विजयन १२ जून रोजी त्यांच्या पलावक्कम येथील घरी मृतावस्थेत आढळला. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, प्रदीपला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि चक्कर येत होते, त्याने याबाबत मित्रांनाही सांगितलं होतं. खूपदा फोन करूनही प्रदीपकडून प्रतिसाद न मिळाल्याने दोन दिवसांनंतर त्याचा एक मित्र त्याच्या घरी गेला. दार खूपदा ठोठावलं पण आतून काहीच उत्तर आलं नाही, मग मित्राने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

“ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले?

अग्निशमन दलासह नीलंकराई पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत गेले. त्यावेळी प्रदीप मृतावस्थेत आढळला आणि त्याच्या डोक्याला जखमा दिसून आल्या. त्याचा मृतदेह रायपेट्टा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. डोक्याला दुखापत आणि हृदयविकाराच्या झटक्याने प्रदीपचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं कळतंय, मात्र, नीलंकराई पोलीस मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

प्रदीप विजयनच्या निधनावर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. गायिका आणि अभिनेत्री सौंदर्या बाला नंदकुमार हिने त्याच्या निधनाबद्दल एक्सवर पोस्ट केली आहे. “ही धक्कादायक घटना आहे. ते माझ्या भावासारखे होते, माझे त्यांच्यावर खूप प्रेम होतं, आम्ही रोज कधीच बोललो नाही, पण अधूनमधून बोलायचो तेव्हा आपुलकीने बोलायचो. तुमची खूप आठवण येईल प्रदीप के विजयन अण्णा. तुमच्या आत्म्याला शांती लाभो,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलंय.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीपला सगळे प्रेमाने ‘पप्पू’ म्हणायचे. त्याने २०१३ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याने जननी-स्टार ‘थेगिडी’ आणि ‘हे सिनामिका’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राघव लॉरेन्सच्या ‘रुध्रन’ मध्ये तो शेवटचा दिसला होता. १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’मध्येही प्रदीप सहाय्यक भूमिकेत आहे.