मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्यासोबतच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटक क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी सर्व सिनेसृष्टी आज एकत्र येणार आहे. यानिमित्ताने झी मराठीवर ‘बहुरंगी अशोक’हा कार्यक्रम प्रदर्शित केला. याच निमित्ताने अभिनेत्री अलका कुबल यांनी मामांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अलका कुबल यांनी ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करुन त्यांच्या मनात एक खास जागा मिळविली आहे. अलका कुबल आणि अशोक सराफ यांनी बरेच हिट चित्रपट एकत्र केले आहेत. ‘बहुरंगी अशोक’या कार्यक्रमाच्या निमित्ताने अलका कुबल यांनी अशोक सराफ म्हणजेच मामांचे काही किस्से शेअर केले आहेत.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

“मी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी चित्रपट पाहिलेले नाहीत कारण…”, अशोक सराफ यांनी सांगितले सिनेसृष्टीतील धक्कादायक सत्य

यावेळी त्या म्हणाल्या, “अशोक मामा हे खरोखरच सुपरस्टार होते आणि आहेत. मी मामांसोबत ‘तुझ्यावाचून करमेना’ हा चित्रपट केला. तो माझा आणि त्यांचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी मला पहिला पुरस्कार मिळाला. याचे श्रेय मामांचे आहे.”

“या चित्रपटात मला अनेक दृष्यात काय बोलायचं? काय नाही? आपण त्यात काय जागा काढू शकतो, डायलॉग कसे बोलायला हवे हे सगळे मामांमुळेच समजले. माझं विद्यापीठ हे मामा आहेत. त्यांनी कायम जमिनीवर कसं राहावं हे मला शिकवलं”, असेही अलका कुबल यांनी म्हटले.

“…त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे”, ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ भावूक

“आम्ही एकदा पावसातील गाणे शूट करत होतो. जानेवारी महिना आणि पुण्यात कडाक्याची थंडी. तेव्हा विहिरीतून पाईप लावून आमच्यावर पाण्याचा फवारा केला जात होता आणि मी अक्षरशः कुडकुडत होते. एवढी थंडी मला वाजत होती”, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान फक्त अलका कुबल नव्हे तर अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. बहुरूपी अशोक सराफ हा कार्यक्रम झी मराठीवर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.