श्रेयस आणि दिप्ती तळपदे यांची निर्मिती असलेल्या ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे केली आहेत. चार दिवसात या चित्रपटाने एक कोटींची कमाई केली आहे. १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण राज्यभरात १६७ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
समीर पाटील दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तीन वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील आणि वयोगटातील पुरुषांची छायाचित्रे त्यांना कोणतीही कल्पना न देता पुरुष नसबंदीवरील एका पोस्टरवर झळकतात आणि त्यानंतर या तिघांच्या आयुष्यात जे काही घडते ते विनोदी पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहे. चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून श्रेयस तळपदे, रोहित शेट्टी, फरहान खान, अन्नु मलिक, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी काम केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘पोश्टर बॉईज’चा चार दिवसांत एक कोटींचा गल्ला
श्रेयस आणि दिप्ती तळपदे यांची निर्मिती असलेल्या ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे केली आहेत. चार दिवसात या चित्रपटाने एक कोटींची कमाई केली आहे. १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण राज्यभरात १६७ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

First published on: 06-08-2014 at 07:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poster boys collected 1 crore on box office