दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा अभिनेता आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेला नाही. बाहुबली या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास घराघरात पोहोचला. प्रभासचा आज वाढदिवस. त्यामुळे त्याला राधे श्याम चित्रपटाच्या टीमने एक खास भेट दिली आहे. अलिकडेच प्रभासच्या आगामी राधे श्याम या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये प्रभास एका लक्झरी गाडीला टेकून उभा असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जॉर्जिया येथे सुरु होतं. मात्र, करोना विषाणूमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर राहिलं. त्यानंतर या चित्रपटाचं इटलीमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

आणखी वाचा- ‘बाहुबली’फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?

दरम्यान, ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यात प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारत आहे, तर पूजा प्रेरणा ही भूमिका वठविणार आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas nails modern lover boy image as vikramaditya in new radhe shyam poster dcp 98 ssj
First published on: 23-10-2020 at 12:58 IST