‘आदिपुरुष’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरी पाहता सुपरस्टार प्रभास हा सध्या एका सुपरहीट चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. प्रभासच्या आगामी ‘सलार’ची प्रचंड चर्चा आहे. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या चित्रपटाचा नुकताचा टीझर प्रदर्शित झाला ज्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला. कमाईच्या बाबतीत प्रभासचा हा चित्रपट वेगळाच विक्रम रचणार अशी चर्चा आहे.

प्रदर्शनाआधीच ‘सलार’ ८०० कोटींची कमाई करू शकतो असं म्हंटलं जात आहे. ‘सलार’ प्रदर्शित होण्यासाठी अजूनही २ महीने शिल्लक आहेत आणि यासाठी निर्माते प्रचंड मेहनत घेत आहेत. काही मीडिया रीपोर्ट आणि फिल्म एक्स्पर्टच्या अंदाजानुसार ‘सलार’ प्रदर्शनाआधीच ८०० कोटींची कमाई करू शकतो.

आणखी वाचा : सलमान खान व त्याच्या कंपनीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

थिएट्रिकल हक्क, म्यूज़िक, डिजिटल आणि सॅटेलाइट हक्क या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर ती ८०० कोटींच्या आसपास जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचे परदेशी हक्कदेखील ८० कोटींना विकले गेले असल्याची चर्चा आहे. ‘केजीएफ’ला मिळालेल्या यशामुळे प्रभासच्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाला असला तरी प्रभासचा हा आगामी चित्रपट पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेकिंग कमाई करेल अशी अशा याच्या निर्मात्यांना आहे. ‘सलार’मध्ये प्रभाससह श्रुति हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपति बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.