मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. नुकतंच सईने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या एका चॅलेंजबद्दल बोलताना दिसत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर या दोघीही गेल्या अनेक महिन्यांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. गेल्या १५ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरु झाले आहे. या पर्वाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीने सईला एक हटके चॅलेंज दिलं आहे.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

नुकतंच सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला सई म्हणते की, “प्राजूने मला tounge twister चं चॅलेंज दिलं आहे. मी प्रयत्न करणार आहे… प्राजू तू मला चॅलेंज दिलं आहे त्याची सुरुवात मी हर्रर्रर्रर्र…. अशी करणार आहे. यानंतर सई एक जिभेची बोबडी वळवणारा शब्द दोन ते तीन वेळा बोलते आणि त्यानंतर सई प्राजू मी जिंकले असं म्हणतं तिला चिडवून दाखवते.” त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

…म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

दरम्यान सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार!” असे या नव्या पर्वाचे नाव आहे. गेल्या १५ ऑगस्टपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.