अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताने सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा देतानाच १ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती. पण आता याच पोस्टमुळे ती अडचणीत आल्याचं बोललं जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी अशी पोस्ट लिहिल्यानं प्राजक्ताच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी प्राजक्ताच्या पोस्टनंतर आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारनं अभिनेत्री प्राजक्ता माळीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये चिथावणीखोर भाषण केले. तरीदेखील प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं व आज लोकप्रिय कलाकार झाला आहात. राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल कलाकार प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.”

Prime Minister Narendra Modi addressing an election campaign rally in Jalore, Rajasthan. (Photo: BJP Rajasthan/ X)
मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; मुस्लिमांना संपत्तीचे फेरवाटप करण्याच्या आरोपावरून संतप्त प्रतिक्रिया, आयोगाकडे तक्रार
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Mahua Moitra
उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

आणखी वाचा- राणादा- पाठकबाईंची नवी इनिंग! अक्षया आणि हार्दिकनं चाहत्यांना दिला सुखद धक्का

काय होती प्राजक्ता माळीची पोस्ट?
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये प्राजक्ताने पारंपारिक वेशभूषा केल्याचे दिसत आहे. यासोबतच तिने वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला होता. या लेखात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. ही पोस्ट शेअर करत प्राजक्ताने लिहिलं, “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)”

प्राजक्ता पुढे लिहिते, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद” प्राजक्ताची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली होती. पण काही वेळानं तिनं ही पोस्ट डिलीट केली. मात्र तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते.

आणखी वाचा- Video : ब्रेकअपच्या चर्चांनंतर पुन्हा एकत्र दिसले सिद्धार्थ- कियारा, पण…

दरम्यान प्राजक्ता माळीने याआधी शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातदेखील हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हटके कॅप्शनदेखील लिहिले होते. त्यावेळी देखील तिची सोशल मीडिया पोस्ट बरीच चर्चेत होती. पण आता मात्र अक्षय्य तृतीयेच्या या पोस्टमुळे प्राजक्ता माळीच्या अडचणीत वाढणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.