मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. चित्रपट आणि टीव्ही रिअलिटी शोमुळे नेहमीच चर्चेत राहणारी प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे बरंच ट्रोल व्हावं लागलं होतं. अर्थात या आधीही तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. नुकतंच एका व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळीने याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पेजवरून प्राजक्ताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताला, ‘सोशल मीडियावर तुला अनेकदा ट्रोल केलं जातं त्याबद्दल तुला काय वाटतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ताने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं.

आणखी वाचा-“मला ते करायचे नव्हते, पण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सूत्रसंचालनाबद्दल प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली

प्राजक्ता म्हणाली, “मला ट्रोल केलं जातंय हे मला कधी कधी फार उशीरा समजतं. जेव्हा ते सगळं संपलेलं असेल तेव्हा मला समजतं कारण मी कमेंट्स फारशा वाचत नाही. पण मी प्रत्येक कमेंटचा आदर करते. पण त्याचा अर्थ असा नाही की मला त्यामुळे वाईट वाटायला हवं असं नाही. त्यातून जे चांगलं असेल ते घेऊन स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते. पण जे मला वाटतं हे बोललं जातंय ते चुकीचं आहे तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष करते.”

आणखी वाचा-ना प्रभास, ना सैफ, ‘आदिपुरुष’ टीझरनंतर ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं होतंय कौतुक; काय आहे कारण?

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. सध्या ती एका मराठी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने ती लंडनमध्ये गेली होती. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. मात्र या चित्रपटाचे नाव, स्टार कास्ट याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.