मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता अमृता खानविलकरसोबतच्या तिच्या लावणीमुळे चर्चेत आहे. या निमित्ताने प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

प्राजक्ताने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नवारी साडी नेसल्याचे दिसते. तेचा चित्रपटातला हा लूक शेअर करत कशी वाटली नैना चंद्रापूरकर? मला तर बुवा शिवलेली नव्हे खरी नऊवार नेसून, सगळे खरे सोन्या- मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली, असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता आणि अमृताने चंद्रमुखी चित्रपटातील सवाल जवाब लावणी करताना दिसत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.