काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणावरून सभागृहातच मोठा गदारोळ झाला. राहुल गांधींनंतर लगेचच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राहुल गांधींवर भाषण संपवून लोकसभेतून बाहेर पडताना महिला खासदारांना कथितरित्या फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली.

लष्करी अधिकाऱ्यांनी ‘गदर २’ पाहिल्यानंतर दिला रिव्ह्यू, त्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput death
सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याचं दुःख कुणालाच नाही, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे स्पष्ट मत; म्हणाले, “त्याच्या निधनानंतर शोकसभा…”
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर केलेल्या या आरोपाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत स्मृती इराणींवर संताप व्यक्त केला आहे.

“शैलेश लोढांचा दावा खोटा,” एक कोटींचा खटला जिंकण्याबद्दल असित मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “न्यायालयाच्या आदेशात…”

प्रकाश राज यांनी स्मृती इराणींच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्यावर टीका केली. “प्राधान्य पाहा. मॅडमजी फ्लाइंग किसमुळे नाराज आहेत.. पण मणिपूरमधील महिलांसोबत जे घडले त्याबद्दल नाही,” असं ते म्हणाले.

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी त्या कथित फ्लाइंग किसवर आक्षेप घेताना दिसत आहेत. “ज्याला माझ्याआधी बोलण्याची संधी दिली गेली, त्या व्यक्तीने जाण्यापूर्वी अश्लील कृत्य केले. देशाच्या सभागृहात महिलांशी असशी वागणूक कधीच पाहिली नाही. हे कोणत्या खानदानाची लक्षणं आहेत, ते पूर्ण देश बघतोय,” अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली.