चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा त्यांचा आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’मध्ये दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या ड्रेस डिझायनरच्या भूमिकेत शिरले आहेत. ७० वर्षीय अमिताभने या चित्रपटात सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे, झा त्यांच्या कपड्यांची फार विचार करुन निवड करत होते.
हे सत्य आहे की बच्चन यांनी चित्रपटात घातलेल्या कपड्यांची निवड मी केली आहे, अशी कबुली झा यांनी दिली. बच्चन यांच्यासाठी योग्य पोत आणि धाग्याच्या कपड्यांची निवड करणे गरजेचे होते. चित्रपट चित्रिकरणाच्या ३५ दिवसांपूर्वी झा त्यांच्या सहका-यांसोबत दिल्ली आणि मुंबई येथे साध्या कपड्यांच्या शोधात फिरत होते. ३० ऑगस्टला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात अमिताभ खादी कपड्यांमध्ये दिसणार आहेत. ‘आरक्षण’नंतर अमिताभसोबत झा यांचा हा दुसरा चित्रपट आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
प्रकाश झा बनले अमिताभसाठी ड्रेस डिझायनर
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा त्यांचा आगामी चित्रपट 'सत्याग्रह'मध्ये दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या ड्रेस डिझायनरच्या भूमिकेत शिरले आहेत. ७० वर्षीय अमिताभने या चित्रपटात सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारली आहे.

First published on: 02-07-2013 at 05:09 IST
TOPICSप्रकाश झाबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash jha turns stylist for amitabh bachchan in satyagraha