मराठी अभिनेता प्रसाद ओक ची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. या भूमिकेमुळे प्रसाद ओकचे सर्वत्र कौतुक केले गेले. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. प्रसाद ओकचा एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास आता सर्वांना जाणून घेता येणार आहे. त्याने या भूमिकेसाठी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्याला आलेले अनुभव या त्याच्या प्रवासावर त्याने एक पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ असं या पुस्तकाचं नाव असून नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं.
आणखी वाचा : “बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक…” म्हणत आदित्य ठाकरेंचं आनंद दिघेंना जयंतीनिमित्त अभिवादन

यानिमित्ताने प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विविध फोटोही पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल माहिती देताना दिसत आहेत. यावेळी प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकही उपस्थित होती.

प्रसाद ओकची पोस्ट

“श्री सिद्धिविनायक आणि मा. गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आणि मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब, यांच्या हस्ते “माझा आनंद” या माझ्या पुस्तकाचं आज अनावरण झालं.

मा. दादा भुसे जी, आमचे निर्माते मित्र मंगेश देसाई, आमचे मित्र श्री सचिन जी जोशी, आणि माझी पत्नी मंजिरी ओक हे सर्व माझ्या सोबत या आनंदाच्या क्षणी उपस्थित होते. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो”, असे प्रसाद ओक म्हणाला.

आणखी वाचा : आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पुस्तकाला कोणत्याही राजकारणाचा गंध नाही. केवळ एका कलाकाराने भूमिका साकारतानाच्या प्रवासावर लिहिलेले हे पुस्तक आहे, असे प्रसाद ओक म्हणाला. या पुस्तकाचं प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे केले जाणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे. प्रज्ञा पोवळेनं या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे. तर सचिन गुरवनं याचे अक्षर सुलेखन केलं आहे.