सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटाने महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातला. १३ मे २०२२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली. इतकंच काय तर इतर हिंदी चित्रपटांनाही या चित्रपटाने मागे टाकलं. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आणखी वाचा : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…” प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत यासंबंधीत माहिती दिली आहे. "धर्मवीर आता Zee5 वर माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म, तो 'धर्मवीर' येतोय १७ जूनपासून थेट तुमच्या भेटीला… २०२२ चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट, फक्त @ZEE5 वर!", असे कॅप्शन प्रसादने दिले आहे. आणखी वाचा : प्राजक्ता माळी बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री?, म्हणाली… https://www.instagram.com/p/CesnpwqlaKo/?utm_source=ig_embed&ig_rid=328fc823-23cc-49d5-9686-bb8c96885562 आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्… 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. आजही चित्रपट अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल आहे. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.