सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटाने महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातला. १३ मे २०२२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली. इतकंच काय तर इतर हिंदी चित्रपटांनाही या चित्रपटाने मागे टाकलं. आता प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

त्याचं झालं असं की प्रसादच्या चाहते म्हणजेच आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांनी ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केलं. त्यांनी स्वतः एकट्याने बसून या चित्रपट पाहिला. याचदरम्यानचा आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचा व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणाला, “धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं. याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल.”

आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक

प्रसादने आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचे आभार मानले. तसेच धर्मराज गुरुजी यांनी देखील प्रसादचं तोंडभरुन कौतुक केलं. “माझी इच्छा होती की मी एकट्यानेच हा चित्रपट पाहावा. प्रसाद ओक कोणत्याही कार्यक्रमात जातात तिथे ग्लॅमर हे पाहायला मिळतं. प्रसाद म्हणजे अष्टपैलु कलाकार आहेत. तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुमचा हा चित्रपट बघत असताना मला माझ्या आजूबाजूला अजिबात आवाज नको होता. मला या चित्रपटात फक्त आणि फक्त तुम्हाला बघायचं होतं.” असं धर्मराज गुरुजी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – बेजबाबदारपणा नडला! सुप्रसिद्ध अभिनेत्री दुकानातच विसरली १ लाख रुपये, पुढे असं काही घडलं की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.