Prashant Damle New Play : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. मोठ्या पडद्याबरोबरच त्यांनी मालिका आणि रंगभूमी चांगलीच गाजवली आहे. अशात लवकरच प्रशांत दामले यांचं एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शिकायला गेलो एक’ असं या नाटकाचं नाव आहे. त्यामध्ये प्रशांत दामले यांच्यासह अनेक नवखे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. आता हे नाटक जवळच्या नाट्यगृहात केव्हा पाहता येणार, तसेच यात कोणकोणते कलाकार आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.

‘शिकायला गेलो एक’ हे नाटक पाहण्यासाठी २४ नोव्हेंबरपासून तिकिट बुकिंग सुरू होत आहे. तर नाटकाचा शुभारंभ प्रयोग दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी आहे. नाटकाचं नाव पाहूनच हे नाटक केव्हा पहायला मिळणार, अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर यांनी सांभाळली आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘शिकायला गेलो एक’ नाटकात प्रशांत दामले एका शिक्षकाची भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा : अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ

महेश साने उर्फ शाणे गुरुजी, असं त्यांच्या पात्राचं नाव आहे. प्रशांत दामले यांनी या नाटकाचा एक प्रोमो व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केला आहे. यामध्ये प्रशांत दामलेंनी हातात भूगोल शिकवण्यासाठी लागणारा पृथ्वीचा नकाशा आणि भूमितीचे साहित्य हातात पकडले आहे. स्वत:च्या पात्राची माहिती सांगणारा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये “हास्याचं समीकरण जमवायला, विनोदाचा पाठ सांगायला, अतरंगी इतिहास घडवायला अन् आनंदाचं शास्त्र शिकवायला येतायेत. आपले लाडके शाणे गुरुजी!” अशी कॅप्शन लिहिली आहे.

नाटकात गुरुजींसह अनेक अतरंगी विद्यार्थीदेखील असणार आहेत. यातील विद्यार्थ्यांमध्ये अभिनेता हृषिकेश शेलारदेखील एका भूमिकेत दिसणार आहे. नाटकात हृषिकेश शेलार श्यामसुंदर खराडे उर्फ रिशी पकूर हे पात्र साकारणरा आहे. भावी नेते, लडतरी मेंबर, शिव्यांचे खजीनदार, रंकाळ्याचा रोमिओ, काळजातला दोस्त, या पात्राची अशी काहीशी ओळख व्हिडीओतून झाली आहे.

हेही वाचा : बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री समृद्धी मोहरीर ‘शिकायला गेलो एक’ नाटकात हेलन हे पात्र साकारणार आहे. नटरंगी नार, दिलाची राणी हेलन साने गुरुजींच्या शिकवणीला हजर राहणार आहे. तर गुरुजींच्या मुलीचं पात्र प्रसिद्ध अभिनेत्री अनघा भगरे साकारत आहे. तिने आपल्या बापालाही काळजीपोटी पण प्रेमानं धाकात ठेवलेलं नाटकात दिसणार आहे. हे पात्र अभिनेत्री अनघा भगरे साकारत आहे. नाटकातील पात्रांची ओळख सांगणारे काही प्रोमो व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओ पाहून चाहत्यांना नाटक पाहण्याची ओढ लागली आहे.