बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांच्यावर आर्थिक संकटही कोसळले होते. प्रवीण यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

प्रवीण यांनी आजवर अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. या मालिकेत त्यांनी भीम ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

View this post on Instagram

A post shared by Rahul Dahiya (@rahulindianno1)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण कुमार सोबती यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र अशा अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मेरी आवज सुनो’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

प्रवीण हे एक अभिनेता होतेच त्यासोबतच एक अॅथलीट होते. त्यांनी आशिया खेळांमध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.