लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

‘सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३ दिवस उलटले आहेत. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सर्वत्र जादू पाहायला मिळत आहे. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ पाहिल्यानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट, म्हणाला “प्रवीण मी तुझा…”

प्रवीण तरडे यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. फक्त तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास…फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे…असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे कलेक्शन किती झाले याबद्दलही माहती दिली आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात विक्रमी कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे. तसेच येत्या काही दिवसात हा चित्रपट १५ कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.